*भारत भूषण पुरस्काराने सनेहालय इंग्लिश मीडियम स्कूलइंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वीणा विनीत मुंगी सन्मानित*
शैक्षणिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्यासाठी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वीणा विनीत मुंगी यांना चित्रकुट इंटर नॅशनल स्कूलचे प्रमुख अशोक सचदेव यांच्या हस्ते भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार IDYM ( IGNITING DREAMS OF YOUNG MINDS FOUNDATION ) या भारतातील संस्थेने दिला आहे.जी मीनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स,इस्त्रो, निती आयोग आणि युनायटेड नेशन ग्लोबल मार्केटप्लेस यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे.या कार्यक्रमाचे आयोजन चित्रकूट इंटर नॅशनल स्कुलच्या पुढाकाराने आणि एज्यूद्रोन च्या सहकार्याने करण्यात आले.
प्राचार्या वीणा मुंगी ह्या गेले पंधरा वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याद्वारे त्यांनी चर्चासत्रांचे आयोजन लहान मुलांसाठीचे शिबिर, वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या आहेत… सध्या त्या जगातील नंबर तीन वर असणाऱ्या स्नेहालंय इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत..
पुरस्कार सोहळ्यासाठी संजय चव्हाण ,अनुराधा राणा, अशोक सचदेव पूजा गुरबक्ष उपस्थित होते
यावेळी शिक्षकांसाठी विविध विषयांवरील चर्चासत्र ही आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांना समजून घेताना त्यांचा भावनिक बुद्ध्यांक, बौद्धिक बुद्ध्यांक व सामाजिक बुद्ध्यांक यांचा योग्य समन्वय असणे किती महत्त्वाचे आहे तसेच मुलांना अर्थ नियोजन शिकवणे पण किती महत्वाचे आहे यावरती मान्यवरांची विस्तृत चर्चा झाली
पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी संस्थेच्या सचिव प्रीती भोंबे शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे शाळेचे संचालक हनीफ शेख् यांनी अभिनंदन केले आहे.
वीणा मुंगी यांनी या पुरस्काराचे श्रेय स्नेहालय संस्थेला दिले आहे.