आय डीवाय एम व तारे जमीन पर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ५१ शाळांमधील ५१ प्रिन्सिपल्स यांना “अटल बिहारी वाजपेयी शिक्षण रत्न”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुना कॉलेज ऑफ आर्ट्स,सायन्स ,कॉमर्स येथील सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे शीतल क्रिएशन्स आणि स्त्री शक्ति फाउंडेशनचे संस्थापक शीतल बियाणी,IDYM(इग्नाइटिंग ड्रिम्स ऑफ यंग माइंडस)चे संस्थापक ए रवीशंकर, IDYMचे अध्यक्ष पी के राजपूत,पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ.आफताब अनवर शेख,जेवियर्स इंस्टिट्यूट फॉर कम्युनिकेशनच्या डिनसँड्रा डिसूझा,कॅप्टन चाहत दलाल,सध्याच्या मिसेस गॅलेक्सी २०२३ व शिवाजी शिंदे संस्थापक ब्लॉसम अॅकेडमी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात १४ शाळांच्या सहकार्याने “मल्टी स्कूल मेगा टॅलेंट शो” लॉन्च करण्यात आला.यूआने तारे जमीन पर चा प्रसार होईल.या प्रसंगी उपस्थित प्रिन्सिपल्स यांनी “ पॉवर वॉक” सादर केला.
छायाचित्र : पुरस्काराथींचे समूह चित्र.